Santracruz Police Station saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! यूट्यूबर तरुणीचे फोटो मॉर्फ करायचे, नंतर पैसे घेऊन सोशल मीडियावर....

Morphing Photos of Young YouTuber: मुंबईतील प्रसिद्ध यूट्यूबर तरुणीचे फोटो मॉर्फ करून रेडीट साईट या सोशल माध्यमातून विक्री केली जात होती.

Chandrakant Jagtap

>>संजय गडदे

Mumbai Latest News: मुंबईतील प्रसिद्ध यूट्यूबर तरुणीचे फोटो मॉर्फ करून सोशल माध्यमात पैसे घेऊन विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सांताक्रूझ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नंदलाल धरमसिंह बडेला (20 वर्षे) आणि अंकुर अंकित देब (19वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

आरोपी नंदलाल हा तरुणीचे मॉर्फ फोटो रेडीट साईटवर अपलोड करुन पैसे घेऊन विक्री करत होता तर अंकुर याने इंन्स्टागमवर फिर्यादीचे फेक प्रोफाईल तयार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध यूट्यूबर तरुणीचे फोटो मॉर्फ करून रेडीट साईट या सोशल माध्यमातून विक्री केली जात होती. तसेच तिच्या नावाने इंस्टाग्राम वर फेक अकाउंट देखील तयार केले होते. ही बाब यूट्यूबर तरुणीच्या चाहत्याने तिच्या लक्षात आणून दिली. यानंतर तिने यासंदर्भात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीची इंन्स्टाग्रम साईटवर बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार केले. गुन्ह्याचा तपास करताना इंन्स्टाग्रम कंपनीस पत्रव्यवहार करुन फेक प्रोफाईल तयार करणाऱ्या तरुणाची पूर्ण माहिती मागवण्यात आली. या माहितीनुसार तो आसाममध्ये असल्याचे पोलिसांना समजले. (Mumbai Crime)

तसेच रेडिट साईटवर तरुणीचे न्यूड फोटो अपलोड करणाऱ्याच्या गुगल पे नंबरवरून पोलिसांनी त्याच्या बँक खात्याविषयी माहिती मिळवली. तेव्हा तो तरुण वसई येथे राहणारा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर कक्षातील पोलीस उप निरीक्षक राहुल कोकाटे आणि आकाश राणे यांच्या पथकांनी आसाम आणि वसई येथुन सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meta Microsoft Layoff: मोठी बातमी! मायक्रोसॉफ्ट अन् मेटा २३,००० कर्मचाऱ्यांना नारळ देणार? कंपनी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Drug Party: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

Priyadarshini Indalkar Photos: 'अगं तुझ्या एका नजरेने जीव झाला वेडापिसा' प्रियदर्शनीचे स्टायलिश फोटोशूट

Lawrence of Punjab: 'लॉरेन्स ऑफ पंजाब' वादाच्या भोवऱ्यात; रिलीजआधीच बंदीची मागणी; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे काँग्रेस पक्षाविरोधात आंदोलन

SCROLL FOR NEXT