Crime News file photo saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत नोकराचा मालक व त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला; मालकाचा मृत्यू,परिसरात खळबळ

मुंबईच्या जोगेश्वरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे . घरातील नोकराने मालक व मालकाच्या पत्नी धारदार शस्त्राने हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबईच्या जोगेश्वरीतून धक्कादायक घटना समोर आली आहे . घरातील नोकराने मालक व मालकाच्या पत्नी धारदार शस्त्राने हल्ल्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवरी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली आहे. या हल्ल्यात मालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai) जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात घरातील नोकरानेच मालक व मालकाच्या पत्नीवर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात वयोवृद्ध मालकाचा मृत्यू झाला आहे.

सुधीर चिपळूणकर असे या वयोवृद्ध मालकाचे नाव आहे. तर या हल्यात सुप्रिया चिपळुणकर या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमंक काय घडलं?

सुधीर चिपळूणकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया चिपळुणकर जोगेश्वरी पूर्व भागात वास्तव्यास आहे. ते जोगेश्वरीच्या श्री समर्थ को.आॅप.हौ.सोसायटीत राहतात. जोगेश्ववरीच्या मेघवाडी परिसरात ही सोसायटी आहे. त्यांच्या घरात पप्पू नावाचा नोकर कामाला होता.

या नोकर पप्पूने मालक व मालकाच्या पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात मालकाचा मृत्यू झाला. सोमवारी सांयकाळी ७ वाजणाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आरोपी पप्पू हा फरार झाला असून त्याच्या विरोधात मेघवाडी पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३०७ भा.दं.वि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध पोलीस (Police) घेत आहेत.

पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या; नालासोपाऱ्यात खळबळ

नालासोपाऱ्यात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यात तुळींज जिल्हा परिषद शाळेजवळ सीता सदनमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून महिलेच्या पतीनेच केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नांदगाव व मनमाड नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला, आमदार कांदेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

IND U19 vs PAK U19: पाकिस्तानने जिंकला अंडर 19 एशिया कप; भारताला 191 रन्सने दिली मात

Nandurbar : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय! नंदुरबारमध्ये धक्कादायक निकाल

वाह बापू! शहाजी पाटलांचा डोंगराएवढा विजय, सांगोल्यात किल्ला भेदला, शेकाप-भाजपला हादरा|VIDEO

Manali Winter Tourism: हिवाळ्यात मनाली ट्रिप प्लान करताय? 'ही' आहेत 8 Hidden लोकेशन्स

SCROLL FOR NEXT