mumbai crime news
mumbai crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत आमदाराच्या घरात चोरी; चालकाने मित्राच्या मदतीनेच केली २५ लाखांची चोरी

सूरज सावंत

Mumbai News: मुंबईत आमदाराच्या चोरीची घटना घडली आहे. नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात लाखोंची चोरी झाली आहे. शिंदे यांच्या घरात त्यांच्या चालकाने मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबईतील राहत्या घरात २५ लाखांची चोरी झाल्याची घटना घडली. मुंबईमधील लोढा बेलिसिमो को ऑ हौ सोसायटीत ही घटना घडली आहे. ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची ही घटना घडली.

आमदार शिंदे यांच्या मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपींनी आमदार श्यामसुंदर यांना फोन करून ३० लाखांची खंडणी देखील मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या राहत्या घरात २५ लाखांची चोरीची घटना घडली. चालक आणि त्याच्या मित्राने चोरी केल्यानंतर त्यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना खंडणी देखील मागितली आहे.

चालकाने १ जूनपर्यंत पैसे न दिल्यास रायगडवर जाऊन बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. तसेच आमदार श्यामसुंदर शिंदे यांना सोशल मीडियावर बदनामी करण्याची देखील धमकी दिली.

या प्रकरणी शिंदेंचे स्वीय सहायक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चालक चक्रधर पंडित मोरे आणि त्याचा साथीदार अभिजीत कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे राहत असलेल्या लोढा बेलिसिमो को ऑ हौ सोसायटीत ही घटना घडली. शिंदे यांच्या घरात १ एप्रिल ते २८ मे दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT