A rickshaw Driver physically assaulted a 20-year-old Married women in Aarey Colony Goregaon Police Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! आरे जंगलात रिक्षाचालकाचा प्रवासी महिलेवर अत्याचार; आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News: गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरे जंगात एका रिक्षाचालकाने २० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आरोपी रिक्षाचालकाचे प्रवासी महिलेला आधी मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

इंद्रजित सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील रहिवाशी आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती. तेथून तिने गोरेगाव येथे परतण्यासाठी रिक्षा बुक केली.

दरम्यान, महिला आरे कॉलनीत (Mumbai News) पोहोचली असता, रिक्षाचालकाने एका ठराविक ठिकाणी जंगलात रिक्षा नेली. तेथे गेल्यानंतर आरोपीने आधी महिलेला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. याबाबत कुणालाही सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारानंतर (Crime News) आरोपीने पळत काढत थेट उत्तर प्रदेश गाठले.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिला घाबरली. तिने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांना जखमेच्या काही खुणा आढळून आल्या.

या जखमांबाबत डॉक्टर आणि कुटुंबीयांनी महिलेला विचारले असता, महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी आरे पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा नोंदवला. दरम्यान, पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मालकाला ताब्यात घेत चौकशी केली.

घटनेच्या दिवशी आरोपी इंद्रजित हा रिक्षा चालवत असल्याचं रिक्षामालकाने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तातडीने उत्तरप्रदेश गाठलं आणि आरोपी इंद्रजित याला रविवारी सायंकाळी ताब्यात घेतलं. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT