Mumbai Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : हायवेवरील हॉटेलमध्ये जेवण करायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; नेमकं काय आहे प्रकरण?

हायवेवर एका हॉटेल मध्ये जेवण करणं मात्र त्यांना महागात पडलं, काय आहे हे प्रकरण पाहुयात..

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai Crime News : आरोपी कितीही हुशार असला तरी कुठे तरी चूक करतोच आणि पोलीस नेमकी तिचं चूक पकडून त्याचा माग काढतात. नेमकं असच काहीसं झालय १८ लाखांच्या तेल आणि टँकरसह फरार झाला. प्लॅन एकदम झक्कास होता आणि त्याच्या जोरावर त्यांना महाराष्ट्राची सीमा देखील ओलांडली. मात्र हायवेवर एका हॉटेलमध्ये जेवण करणं मात्र त्यांना महागात पडलं, काय आहे हे प्रकरण पाहुयात. (Latest Marathi News)

पोलिसांच्या ताब्यात असलेले हे आहेत दशरथ यादव आणि अरमान सिद्दीकी या दोघांना वडाळा पोलिसांनी वडाळ्यातून २५,००० लिटर बेस ऑईल तेलाने भरलेल्या टँकरची चोरी केल्या प्रकरणी अटक केली आहे. यांच्या नशिबाने चालकाने टँकरची चावी टँकर मध्येच ठेवली होती.

या दोघांनी दरवाजा तोडला आणि चावी सापडताच धूम ठोकली आणि थेट गुजरात गाठलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारीला टँकर चोरी झाल्याचे समजताच मालकाने यांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली.

सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत या नंबर प्लेट बदललेल्या टँकरचा पोलिसांनी माग काढण्यास सुरवात केली. मुलुंड चेकनाका पार केल्या नंतर भिवंडी आणि वाडा तसेच गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दी पर्यंत पोलिसांना टँकरचा माग काढण्यात यश मिळालं खर मात्र त्यापुढे काही सुगावा लागत नव्हता.

दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे दोघे सागर नावाच्या हॉटेलात जेवल्याच दिसलं, हॉटेल मालकाच्या चौकशीत त्यांनी ऑनलाईन बिल भरल्याच निष्पन्न झालं मग काय पोलिसांनी लागलीच त्यांचा मोबाईल नंबर मिळवला, पुढे त्यांच लोकेशन काढून त्यांना गुजरातवरून (Gujrat) अटक करणे पोलिसांसाठी (Police) अवघड नव्हतं.

यातील दशरथ यादव नावाचा आरोपी हा स्वतः पण टँकर चालक आहे मात्र त्याचा टँकर हफ्ता न भरल्याने बँकेने जप्त केला होता... दशरथला टँकर चोरी करून तो चालवून पैसे कमवायचे होते, जेव्हा त्याला समजलं की टँकर भरलेला आहे त्यातील ८००/९०० लिटर बेस ऑईल त्याने विकले देखील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT