mumbai crime  Saam tv
मुंबई/पुणे

Fake doctor in Mumbai : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर; रुग्णांना द्यायचा रुग्णांना इंजेक्शन आणि सलाइन

Fake doctor news : मुंबईत मालाड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात बेकायदेशीर क्लिनिक चालवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News:

मुंबईत मालाड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात बेकायदेशीर क्लिनिक चालवणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखे कक्ष १२ ने कारवाई केली आहे. परवेज अब्दुल अजित शेख, शहाजी या सहाब अली अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी परवेज अब्दुल अजित शेख हा एका हत्येच्या प्रकरणात २००३ पासून फरार होता. त्याच्या मुंलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद आहे. या परवेज शेखचा शोध घेत असताना मुंबई पोलिसांच्या पथकाने मालवणीमधील क्लिनिकचा भंडाफोड केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, परवेज शेखच्या विरोधात २०२३ मध्ये हत्येचा गुन्हा नोंद होता. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार होता. मुंबई पोलिसाचं पथक त्याच्या मागावर होते. यावेळी आरोपी हा मालवणी परिसरात अवैध क्लिनिक चालवत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेऊन क्लिनिकवर छापा टाकला. या क्लिनिकमधील बोगस डॉक्टर परवाना नसताना इंजेक्शन आणि सलाईन देऊन फसवणूक करत असल्याचं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी या बोगस डॉक्टरला अटक केली. या कामात त्याची पत्नीही साथ देत असल्याचे आढळले.

आरोपीच्या पत्नीकडे बीयूएमएस ही पदवी आहे. या क्लिनिकमध्ये परवाना नसलेली औषधे ठेवली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी परवेज शेख आणि त्याची पत्नी यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420, 34 या कलमासह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट कलम 33 अ, 33 ब, 35 (2), 36 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेने या आरोपींना मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या आरोपी विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात २०२१ तर मालवणी पोलीस ठाण्यात २०१९ आणि २०२० मध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणात आरोपी परवेजसह त्याची 32 वर्षीय पत्नी यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात 2023 मध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT