Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बनावट बँक हमीपत्र सादर करत मिळवलं कंत्राट; महापालिकेच्या आर उत्तर विभागातील खळबळजनक घटना

यामुळे महापालिकेला जवळपास १४ लाख १८ हजार ९१३.४० रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली आर उत्तर प्रभाग कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका क्षेत्रातील चालू बांधकामांच्या ठिकाणावरील डेंग्यू अळ्या नष्ट करण्यासाठीचे स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राट बनावट बँक हमीपत्र सादर करून कंत्राटदाराने महापालिकेला गंडवलं आहे. (Latest Marathi News)

यामुळे महापालिकेला जवळपास १४ लाख १८ हजार ९१३.४० रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. याप्रकरणी आर उत्तर विभागाचे कीटक नियंत्रण अधिकारी राहुल गाडे यांनी मे.अब्बासिया नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेचे हैदर रजा अयुब हुसेन या कंत्राटदारा विरोधात बोरिवलीच्या एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेतर्फे चालू बांधकामांच्या ठिकाणी खाजगी कंत्राटदाराला अळीनाशके फवारण्यासाठी स्वयंसेवक नेमण्याचे कंत्राट 14 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वात कमी दरपत्रक असलेल्या मे.अब्बासिया नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेस देण्यात आले. यावेळी 90,700/- इतक्या रकमेची बँक गॅरंटी व इतर कागदपत्रे जमा करण्या संदर्भात महापालिकेच्या आर उत्तर विभागाने कळविले. महापालिकेत सोबत करार करताना कंत्रालदाराने कागदपत्रे आणि ठरलेली बँक गॅरंटी जमा केले. यानंतर या संस्थेस लेखाधिकारी आर/उत्तर विभाग यांनी 15 ऑक्टोबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 या काळात 14 लाख 18 हजार 913 रुपये इतका कामाचा मोबदला दिला.

महापालिकेने कंत्राटदारास वेंडर कोड क्र. 7152 हा दिलेला आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेकडून या कंत्रालदाराच्या कामाच्या कागदपत्रांची पाहणी केली असता कागदपत्र बनावट असल्याचा संश आला. म्हणून कीटक नियंत्रण अधिकारी राहुल गाडे यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कंत्रालदाराने घेतलेल्या बँक गॅरंटी संदर्भातील माहिती ईमेल द्वारे मागवली. मात्र अशी कोणतीही बँक गॅरंटी मे.अब्बासिया नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेस मुंबई बँकेने ईमेल द्वारे कळवले.

फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कीटक नियंत्रण अधिकाऱ्याने यासंदर्भात पालिका मुख्यालयात लेखी कळवले. शिवाय कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस पाठवून त्याचेही उत्तर मागवले. मात्र फसवणुकीचा हा प्रकार पाहता कीटक नियंत्रण अधिकारी राहुल गाडे यांनी यासंदर्भात बोरिवली पश्चिमेकडील एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार मे.अब्बासिया नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्था आणि तिचे मालक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT