Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत चाललंय काय? किरकोळ कारणावरून जमावाकडून तरुणाची हत्या, २ पोलिसांवरही हल्ला

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai Crime News:

मुंबईच्या मालाड मालवणीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाडच्या अंबोजवाडी परिसरात जमावाकडून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. जमावाच्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने मालवणीच्या अंबोजवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाड परिसरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या मालवणीतील अंबोजवाडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जमावाच्या हल्ल्यात दोन पोलीस देखील जखमी झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

गोविंद चव्हाण आणि उज्जा चव्हाण हे दोघे एकमेकांच्या शेजारी राहतात. या दोघांमध्ये दारु पिण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर झालेल्या हाणामारीत उज्जा चव्हाण याचा मारहाणीनंतर त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मालवणीतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्य आरोपी गोविंद चव्हाण या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

फटाका जवळ फोडल्याच्या रागातून ४ जणांवर चाकूहल्ला

मुंबईत फटाका जवळ फोडल्याच्या कारणातून दोघा भावांनी चौघांवर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर या चाकूहल्ला प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT