Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : नालासोपारा हादरले, अल्पवयीन मुलीवर दोघांचा सामूहिक अत्याचार!

Mumbai Crime News : नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Crime News : बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आशाचत आता मुंबईजवळच्या नालासोपारा (Mumbai Nalasopara Crime) येथे थरकाप उडवणारी घटना घडली आहे. नालासोपाऱ्यात १७ वर्षीय अल्पवयीन (Crime) मुलीवर सामुहिक अत्याचार झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्‍यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधूनमधून नालासोपार्‍याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्‍या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती. गुरुवारी २५ वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्या मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.

तुळीज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि मुलीची केवळ ४-५ दिवसांची ओळख होती. तिला फिरवण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळीज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT