Merry Kom Fame Actor Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: 'मेरी कोम' फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला, मुंबईतल्या वर्सोव्यातील घटनेने खळबळ

Merry Kom Fame Actor Attacked: मेरी कोम सारख्या चित्रपटातील भूमिका आणि क्राइम पेट्रोल सारख्या टीव्ही शोसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता राघव तिवारीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.

Priya More

मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'मेरी कोम' फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतल्या वर्सोवामध्ये ही घटना घडली. राघव तिवारी असं या अभिनेत्याचे नाव आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राघवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मेरी कोम सारख्या चित्रपटातील भूमिका आणि क्राइम पेट्रोल सारख्या टीव्ही शोसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता राघव तिवारीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. वर्सोवा येथे राघव तिवारी याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी मोहम्मद जैद याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राघव तिवारी हा खरेदी करून मित्रासोबत घरी परत जात असताना रस्ता ओलांडताना एका दुचाकी वाहनाने त्याला धडक दिली. राघवच्या म्हणण्यानुसार मी माझी चूक मान्य केली आणि माफी मागितली. मात्र दुचाकीस्वाराने माझ्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी त्याला विचारले तेव्हा तो रागाच्या भरात बाईकवरून उतरला आणि त्याने माझ्यावर हल्ला केला.

धारधार शस्त्राने राघववर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या राघवला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला पण याप्रकरणी अद्याप कोणालाच अटक केली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT