KENYAN CITIZEN DETAINED IN MUMBAI AFTER 25 YEARS OF ILLEGAL STAY; VAKOLA POLICE ATC TAKES ACTION Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई, केनियाच्या नागरिकाला अटक; नेमकं कारण काय?

Mumbai News : मुंबईतील वाकोला परिसरात तब्बल २५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या केनियाच्या नागरिकाला वाकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. FRRO मार्फत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Alisha Khedekar

  • वाकोला पोलिसांच्या ATC पथकाने केनियाच्या नागरिकाला ताब्यात घेतले

  • संबंधित व्यक्ती तब्बल २५ वर्षांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती

  • तपासात त्याचा व्हिसा २००० साली संपल्याचे उघड झाले

  • गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

संजय गडदे, मुंबई

मुंबईत तब्बल 25 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या केनियाच्या नागरिकाला वाकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATC) ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेची भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओसिनो अँथोनी ओमांडी (वय 61) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात राहत होता. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वाकोला येथील बिस्मिल्ला सैदी चाळ, वाकोला मशीद, नेहरू रोड परिसरात एक विदेशी नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वाकोला पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने संबंधित परिसरात शोधमोहीम राबवली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ओसिनो अँथोनी ओमांडी हा व्यक्ती आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने आपण केनिया देशाचा नागरिक असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य ओळखपत्रांची तपासणी केली. तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली. ओमांडी याचा व्हिसा सन 2000 मध्येच संपुष्टात आला होता. मात्र त्यानंतर कोणतीही वैध परवानगी अथवा कागदपत्रे न घेता तो भारतात राहत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडून केनियाच्या नागरिकत्वासंदर्भातील कागदपत्रे, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच त्याने स्वतः केनियाचा नागरिक असल्याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या संबंधित विदेशी नागरिकाला भारतातून हद्दपार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून परकीय नागरिक नोंदणी अधिकारी (FRRO) तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेमार्फत पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग), पोलीस उपआयुक्त परिमंडळ-8, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकोला विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस ठाणे तसेच पोलीस निरीक्षक खराडे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT