Mumbai Crime News - मुंबईतील (Mumbai) चर्चगेट रेल्वे स्थानकावर रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकावर एका ४५ वर्षीय महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Mumbai Latest Crime News)
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित जीआरपी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती रोशन नाईक याला अटक केली आहे. तर पत्नी हेमा नाईक रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. (Mumbai Breaking News)
या प्रकरणी आरोपी पती रोशन नाईकला चर्चगेट रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पीडित हेमा नाईक आणि तिचा पती रोशन नाईक हे पालघरचे रहिवासी असून रविवारी कुलाब्यात एका घरघुती कार्यक्रमासाठी आले होते. दुपारच्या सुमारास हेमा नाईकचे कुटुंबीय आणि रोशन नाईक यांच्यात वाद झाले आणि तो तिथून रागाने निघुन गेला. (Tajya News)
हेमा पालघरला घरी परत जाण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्टेशनला पोहोचली असता तिथे वाट पाहत असलेल्या रोशन नाईकने तिच्यावर चाकूने वार करत तिला जखमी केले. हेमावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.