Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: तोतया पोलिसाकडून लाखोंची फसवणूक; सापळा रचत चोरट्यांचा पर्दाफाश

आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील डीएम नगर परिसरात एका व्यावसायिकाला पोलीस असल्याचे सांगत लुटल्याची घटना घडलीये. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवली. आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली आहे. (Latest Crime News)

पोलिसांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावर मोठ्या शिताफीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फिरोझ फय्याज खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी किशन कुमार बसवराज हल्ली आझाद नगर मेट्रोस्थानाक शेजारील एचडीएफसी बँकेजवळून जात होता. यावेळी समोरून आलेल्या तीन व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यास बोलण्यात गुंतवले. नंतर या व्यक्तीच्या बॅगेतील एक लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली. यासंदर्भात त्यांनी स्वतः डी एन नगर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शशिकांत माने,स. पो. आ. मिलिंद कुरडे,व. पो. नि. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली.

आरोपी हा आंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने सपोनी राकेश पवार यांना दिली. बातमीची खातर जमा होताच गुन्हे प्रकटीकरण पथक आंबिवली येथे पोहचले.आरोपी फिरोज फय्याज खान हा त्या ठिकाणी असलेल्या एका सलोनमध्ये दाढी करत असतानाच त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

आरोपीने अटक टाळण्यासाठी प्रतिकार करत साथीदारांच्या मदतीने पोलीसांवर दगडफेक केली. यानंतर पोलीस बळाचा वापर करून आरोपी फिरोझ फय्याज खान याला ताब्यात घेऊन डी एन नगर पोलीस ठाणे येथे आणले. आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर आझाद नगर मेट्रोस्थानकाजवळील गुन्ह्यातील त्याची कबुली दिली.आरोपी फिरोझवर मुंबई, ठाणे,नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे येथे पोलीस बतावणी चे एकूण 35 गुन्हे नोंद आहेत.

सपोनि राकेश पवार, पो उपनि नायकवडी,पोहवा पवार , मपोह पेडणेकर,पोहवा पाटील,पो ना दुगाने,पोशि पांढरे, पोशि बाबर,पोशि वरे,पोशि मेहेत्रे,पोशि लाडे,पोशि पटेल. या तपास पथकाने मोठे साहस दाखवून आरोपींचा हल्ला परतावून लावत आरोपीला कल्याण आंबिवली येथून अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर; व्हिडीओ कॉल करणं आता झालं अधिक सोपं

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

SCROLL FOR NEXT