Mumbai Sakinaka Area Murder Case Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: प्रेमाचा भयानक अंत! धावत्या रिक्षातच प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Sakinaka Area News: मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

जयश्री मोरे, साम टीव्ही

Mumbai Sakinaka Area Murder Case: मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक भयानक घटना समोर आली आहे. रिक्षातून प्रवास करत असतानाच प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. या भयानक घटनेत ३० वर्षीय प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मात्र, पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली. दीपक बोरसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ३० वर्षीय विवाहित महिलेचं आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती संघर्षनगर येथे आपल्या आईकडे राहत होती.

मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. आरोपी दीपक बोरसे यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध (Crime News) होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी आणि त्याची प्रेयसी साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथून एका रिक्षातून जात होते.

दोघांमध्ये काही कारणावरून धावत्या रिक्षातच (Mumbai News) शाब्दिक चकमक सुरु झाली. क्षणार्धात या चकमकीचं रुपांतर वादात झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी दीपक याने प्रेयसीच्या गळ्यावरुन धारदार चाकू फिरवला.

या थरकाप उडवणाऱ्या घटनेत संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर आरोपी दीपक हा फरार झाला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याच्या मुसक्या आवळल्या. दीपकने त्याच्या प्रेयसीची हत्या का केली? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muradabadi Biryani Recipe: घरच्या घरी कशी बनवाल मुरादाबादी बिरयानी?

कर्जत-पनवेल प्रवास फास्ट होणार; गेमचेंजर रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीने पालिकेत पोहचले; भाजप उधळपट्टी करत असल्याची टीका

Petrol Price Today: पेट्रोल महागले! तुमच्या शहरात किती आहे पेट्रोलची किंमत? वाचा

NEET Paper Leak: ६०० मार्क्सची खात्री, प्रश्नपत्रिकेसाठी १२ लाख; नाशिकच्या शुभमने कसा फोडला नीटचा पेपर?

SCROLL FOR NEXT