Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक कामासाठी वापरणाऱ्या एजन्सी चालकास अटक

मालवणी व चारकोप पोलिसांची संयुक्त कारवाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई - मालाड पश्चिमेकडील मालवणी पोलीस (Police) ठाणे हद्दीतील फर्जी गॅस एजन्सीचा भांडाफोड करण्यात मालवणी आणि चारकोप पोलिसांना यश आले आहे. महिनाभरापूर्वी पोलिसांनी या फर्जी एजन्सीवर छापा टाकून शेकडो गॅस सिलेंडर आणि आल्टी पलटीसाठी वापरलेले जाणारे सामान जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात देखील घेतलं होतं. मात्र या आरोपींची (Accused) सखोल चौकशी केली असतात्यांना घरगुती गॅस पुरवणाऱ्या फर्जी एजन्सीच्या चालकास पोलिसांनी अटक केली आहे. (Mumbai Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे एक महिन्यापूर्वी मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात एका गोडाऊनमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर टाकी मधून गॅस अल्टी पलटी करून तो लहान लहान व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरला जात असल्याविषयीची माहिती मालवणी पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली.

यानंतर प्रत्यक्षात गोडाऊन वर जाऊन छापा टाकून शेकडो घरगुती सिलेंडर आणि लहान लहान व्यवसायिक सिलेंडरच्या टाक्या शिवाय अल्टी पलटी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य व तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांची चौकशी केली असता त्यांना घरगुती गॅस पुरवणाऱ्या अजून दोन आरोपींची माहिती समजली यानुसार नदीम आणि चंदू नावाच्या दोन व्यक्तींचा खुलासा झाला. पोलिसांनी नदील यांची देखील सखोल चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

एचपीसीएल कंपनी द्वारा संचलित कांदिवली पश्चिमेकडे गॅस एजन्सी चालवणाऱ्या केतकी देसाई यांचा या बोगस गॅस एजन्सीशी संबंध असल्याचे आढळून आले. संबंधित महिलेची चारकोप पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या फर्जी गॅस एजन्सीला घरगुती गॅस सिलेंडर पुरवण्याचे काम करत असल्याचे तिने कबूल केले यानंतर तिला अटक देखील करण्यात आली आहे.

चारकोप पोलिसांनी संबंधित गॅस एजन्सीची मालकीण केतकी देसाई हिला अटक केल्यानंतर शुक्रवारी मुंबईच्या बोरिवली न्यायालयात हजर केले असता घटनेचे गांभीर्य पाहून न्यायालयाने देखील तिला चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आसनगाव येथील एस के आय कंपनीला भीषण आग

Diwali Lucky Zodiac Sign: या लोकांसाठी दिवाळी ठरणार शुभ; या राशींवर पडणार पैशांचा पाऊस, शनीचा होणार फायदा

Bigg Boss 19: रात्री कपडे बदलणार होती तेवढ्यात...; अभिषेकच्या 'या' वागण्यामुळे अशनूर संतापली

Dharmapuri Fort History: धर्मापूरी किल्ला माहितेय का? जाणून घ्या ऐतिहासिक वारसा आणि महत्त्वाची वैशिष्ट्ये

मोठी बातमी! खासदार संजय राऊत फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल

SCROLL FOR NEXT