Mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार; संतापजनक कृत्याने परिसरात खळबळ

Mumbai Crime News: मुंबईत अंधेरी पूर्व परिसरात एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत अंधेरी पूर्व परिसरात एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी गुंदवलीत राहणाऱ्या एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अंधेरी पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ३० वर्षीय नितीनला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील गुंदवलीत राहणाऱ्या सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार केला. त्यानंतर या आरोपीने पळ काढला.

या पीडित मुलीने हा सारा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपीचा तपास करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband- Wife Relation: लहानसा बदल, मोठा परिणाम; बेडरूमची 'ही' दिशा वाढवू शकते पती-पत्नीतील भांडणं, वेळीच मांडणी बदला

काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Kriti Sanon: करोडपती बिजनेसमॅनचा हात धरुन लंडनच्या रस्त्यांवर फिरते क्रिती सॅनन, अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

SCROLL FOR NEXT