Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : पत्नीला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला अटक; संशयाचं भूत डोक्यात शिरल्याने कृत्य

Crime News : सरिता संजयपासून दीड वर्षापासून बहिणीकडे जाऊन राहू लागली होती.

सूरज सावंत

मुंबई : महिलेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल कुर्ल्यातून समोर आली होती. याप्रकरणी महिलेच्या पतीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न नवऱ्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या सरिता ठाकूर या महिलेस उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय ठाकूर याचे सरिता यांच्यासोबत १३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र दोघांना चारही मुलीच झाल्या. मुलगा होत नाही यावरून दोघांमध्ये सतत वाद होत असत.  (Mumbai News)

संशयाचा भूत डोक्यात शिरलं

रोजच्या वादाला कंटाळून सरिता संजयपासून दीड वर्षापासून बहिणीकडे जाऊन राहू लागली होती. मात्र संजयच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं होतं. सरिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन संजयने बुधवारी तिला कामावर जाताना गाठलं.  (Breaking News)

पूर्वद्रूतगती मार्गावर चुन्नाभटीच्या अण्णा भाऊ साठे उड्डाण पुलाखाली सरिता आणि संजय यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी संजयने अचानक स्वत: जवळील पेट्रोलची बाटली सरितावर मोकळी करत लायटरने तिला पेटवले आणि तेथून पळ काढला.

रिक्षावाला बनला देवदूत

मात्र याच रस्त्यावरुन जात असलेले रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख सरिताच्या मदतीला धावून आले. मोहम्मद यांनी गाडीतील पाण्याची बॉटल घेतली आणि सरिताच्या अंगावर ओतून आग विझवली. त्यानंतर त्याने तिला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल देखील केले. (Latest Marathi News)

वेळीच सरिताला सायन रुग्णलयात उपचारासाठी दाखल केल्याने तिचा जीव वाचला आहे. या प्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात संजय ठाकूर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT