mumbai Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News:पोलिसांकडे त्याने ती गोष्ट मागितली; नकार मिळताच कोठडीतच..., धक्कादाक घटना

अंमली पदार्थ न दिल्याने एका आरोपीने पोलीस कोठडीमध्येच भींतीवर डोकं आपटून घेतलं आहे.

सुरज सावंत

Mumbai Crime News: अनेक तरुण सध्या अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. अंमली पदार्थ न मिळाल्याने तरुण आत्महत्या देखील करत आहेत. अशात मुंबईमधून अशीच एक घटना समोर आली आहे. अंमली पदार्थ न दिल्याने एका आरोपीने पोलीस कोठडीमध्येच भिंतीवर डोकं आपटून घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Police)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या आरोपीने कोठडीत पोलिसांकडे अंमली पदार्थांची मागणी केली. मात्र पोलिसांनी यासाठी नकार दिल्याने त्याला राग असह्य झाला. तसेच अंमली पदार्थ न निळाल्याने त्याच्या शरीरात वेगळ्या हालचाली जाणवू लागल्या. अशात त्याने स्वत:चे डोके भिंतावर आपटत आतमहत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

नबीहुसेन अलीहुसेन शेख (वय २८) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर जी टी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धारावीच्या राहणाऱ्या नबीहुसेला लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. न्यायालयातून त्याची पोलीस कस्टडी घेत आरोपीला एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या सर्व साधारण लॉकअपमध्ये ठेवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नबीहुसेन हा अंमली पदार्थांच्या पुरता आहारी गेल्यामुळे मंगळवारी दुपारी तो पोलिसांकडे त्याची मागणी करू लागला. अंमली पदार्थ न दिल्यास कोर्टात खोटे आरोप करून पोलिसांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवणाच्या गोष्टी तो करू लागला.

पोलीस अंमली पदार्थ देत नसल्याकारणाने रागातून तो स्वत:चं डोकं जेलच्या भिंतीवर जोरजोरात आदळून आरडा ओरडा करत आत्महत्येचा प्रयत्न करू लागला. नबीहुसेनला तात्काळ पोलिसांनी जी टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती ठिक आहे. नबीहुसेनवर संपूर्ण मुंबईत (Mumbai) ४१ चोरी व इतर गुन्हे दाखल आहे. या प्रकणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

Padded Blouse Designs: बॅकलेस आणि डीप नेक साडीवर उठून दिसतील पॅडेड ब्लाऊज, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

SCROLL FOR NEXT