11 Years Old Boy Physically Assaulted Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, नातेवाईकाला १२ वर्षांचा तुरुंगवास

11 Years Old Boy Physically Assaulted: आरोपीने मज्जातंतूचा विकार असलेल्या आपल्या ११ वर्षांच्या पुतण्याचे लैंगिक शोषण केले होते याप्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले.

Priya More

११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टाने १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती. आरोपीने आपल्या नातेवाईकाच्या ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार आणि छळ केला होता. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली. आरोपीला १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोक्सो न्यायालयाने २१ ऑगस्ट रोजी एका ५५ वर्षीय व्यक्तीला अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणामध्ये १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आरोपीने मज्जातंतूचा विकार असलेल्या आपल्या ११ वर्षांच्या पुतण्याचे लैंगिक शोषण केले होते याप्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले. आरोपी कांदिवलीचा रहिवासी आहे.

'आरोपी त्याच्या मूळ इच्छा आणि प्रवृत्तीला बळी पडला होता आणि पीडित मुलगा आजारी आहे आणि तो त्याच्या नातेवाईक आणि मित्राचा मुलगा आहे याची काळजीही त्याने घेतली नाही. त्यामुळे आरोपीने केलेले कृत्य हे पीडित मुलाच्या वडिलांनी त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा स्पष्टपणे गैरवापर करणारे होते.' असे म्हणत कोर्टाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली.

आरोपी मुलाच्या कुटुंबासोबत कांदिवली येथे राहत होता. १६ मार्च २०१७ रोजी पीडित मुलाने आरोपीने केलेल्या कृत्याची माहिती आपल्या वडिलांना दिली. पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांना मारहाण केली. असे असताना देखील पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपीला इशारा दिला आणि आपल्या मुलापासून दूर राहण्यास सांगितले.

असे असताना देखील आरोपीने चार दिवसांनंतर पुन्हा ११ वर्षांच्या या मुलाचा लैंगिक छळ केला. त्यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कलम ६ आणि १२ नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT