Mumbai Crime Saam TV
मुंबई/पुणे

Crime News: मित्रचं ठरले वैरी! जुन्या भांडणाचा राग, चार अल्पवयीन मित्रांनी मित्राचीच केली भोसकून हत्या

ही मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असायचे, काही दिवसांपुर्वी त्यांच्यात यामुळेच वाद झाला होता. याच वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

Mumbai: जुन्या भांडणाच्या रागातून चार मुलांनी आपल्याच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी मुंबईमध्ये घडली आहे. हत्या करणारे चारही आरोपी अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. ही मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असायचे, काही दिवसांपुर्वी त्यांच्यात यामुळेच वाद झाला होता. याच वादातून ही हत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. (Mumbai Crime)

मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई दुबईत कामाला असून वडील मुंबईत राहत होते. या दोघांचा घटस्फोट झाल्याने मुलगा मानखुर्द परिसरात आजोबांसोबत राहत होता. चार जानेवारी सायंकाळी सहा वाजता ही सर्व मुले एकत्र बसली होती. याचवेळी त्यांनी कोयत्याने व चाकूच्या साहाय्याने या १६ वर्षीय बालकाची हत्या केली. पोस्टमॉर्टममध्ये असे आढळून आले की, अल्पवयीन मुलांनी मिळून मृताच्या शरीरावर 14 ठिकाणी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच हत्या करणाऱ्या ४ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: नवजात बाळाला गाईचं दूध दिलं, शरीरात झालं इन्फेक्शन; २१ दिवसानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

Mugachi Khichdi Recipe: मऊ, लुसलुशीत मुगाची खिचडी कशी बनवाल?

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

SCROLL FOR NEXT