anjali Damania
anjali Damania Saamtv

Anjali Damania: 'ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल?' अंजली दमानियांनी भाजपच्या कार्यक्रमातील Videoचं काढला; चित्रा वाघ यांच्यावर टीका

अंजली दमानिया यांनी भाजपाच्या जनआक्रोश महासभेतील व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on

Anjali Damania: भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होत महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे.

अंजली दमानिया यांनी भाजपाच्या जनआक्रोश महासभेतील व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

anjali Damania
Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; राऊतांच्या दौऱ्यापूर्वी असंख्य पदाधिकारी शिंदे गटात

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपा नेत्या चित्रा वाघ( Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी ट्विटरवर भाजपाच्या जनआक्रोश मोर्चातील एक व्हिडिओ ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावलर टीका केली आहे.

ट्विट केलेला हा व्हिडिओ भाजपा जनआक्रोश महासभेतील असून मंचावर तरुणी डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विट करत अंजली दमानिया यांनी "प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या श्री रमेशबिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?" अशा शब्दात चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

anjali Damania
Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट! 'या' जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, रस्त्यांवर दाट धुक्यांची चादर

अंजली दमानिया( Anjali Damania) यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधल्याने वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान काल पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद प्रकरणात राज्य महिला आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com