Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! आधी हात-पाय बांधले, मग वृद्धाला संपवले; केअरटेकरवर संशय

Latest News: या हत्या प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Priya More

जयश्री मोरे , मुंबई

Mumbai News: दोन वेगवेगळ्या हत्यांच्या घटनेमुळे मुंबई (Mumbai) हादरली आहे. सांताक्रुझमध्ये (Santacruz) एका वयोवृद्ध व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेमध्ये मानखुर्द (Mankhurd) परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही हत्या प्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

सांताक्रुझमध्ये मुरलीधर पुरुषोत्तम नाईक (85 वर्षे) या वयोवृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मुरलीधर नाईक यांची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. घरामध्ये काम करणाऱ्या केअर टेकरने हत्या केलाचा संशय व्यक्त केला जात आहे. मुरलीधर यांचे हात-पाय बांधून नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

मुरलीधर हे आपली पत्नी आणि केअर टेकर नमो कृष्णा मनबहादूर पेरियार यांच्यासोबत राहत होते. 8 दिवसांपूर्वीच नमो कृष्णाने त्यांच्या घरी केअर टेकर म्हणून कामाला सुरुवात केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुरलीधर यांची हत्या का करण्यात आली यामागचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

दुसरी घटना ही मानखुर्द येथे घडली आहे. मानखुर्दमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यामध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याची हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वीज वितरण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला

Sunny Deol Film: सनी देओल त्याच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स; नव्या चित्रपटातील खास सीन लीक

MHADA Lottery Cancel : म्हाडा विजेत्यांना मोठा दणका! घराचा ताबा न घेतल्याने हक्क रद्द होणार

Bribe Case : गावच्या कारभारीने मक्तेदाराकडून घेतले ८० हजार; एसीबीच्या कारवाईत तिघेजण ताब्यात

Pune: पुण्यात पुन्हा दहशतवादी? 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर झळकले; ATS कडून १९ ठिकाणी छापेमारी

SCROLL FOR NEXT