VIRAR SHOCKER: 15-YEAR-OLD BOY STABBED OVER PARKING DISPUTE, CCTV CAPTURES ENTIRE ATTACK Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई हादरली! पार्किंगचा वाद टोकाला गेला, १५ वर्षीय मुलाच्या पोटात चाकू खुपसला अन्...

Mumbai Virar Crime : विरार पूर्वेतील कारगिल नगर परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादातून १५ वर्षीय शहीद शाह याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Alisha Khedekar

  • विरारमध्ये पार्किंगच्या वादातून १५ वर्षीय मुलावर चाकूहल्ला झाला.

  • गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

  • हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  • आरोपी हल्ल्यानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

मनोज तांबे, मुंबई

Mumbai Virar Crime News मुंबई लोकलमधील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच विरारमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंगमध्ये वाहन उभे करण्याच्या किरकोळ वादातून १५ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना विरार पूर्वेतील कारगिल नगर परिसरात घडली. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील कारगिल नगर येथील गणेश चौक परिसरातील महाकाली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. पार्किंगच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला. याच दरम्यान एका व्यक्तीने संतापाच्या भरात १५ वर्षीय शहीद शाह याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या शहीद शाहला तातडीने विरार पूर्वेतील रेडिएंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून अशा प्रकारे अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे विरार परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर

वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज नाही, घरीच करा 5 सोपे उपाय

Mumbai local : मुंबई लोकल हत्याकांडातील धक्कादायक सत्य समोर; दारूच्या नशेत आरोपीने केला पोटात वार

Maharashtra Infrastructure : प्रवास होणार सुसाट! नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला हिरवा कंदील

Today Gold Price: मोठी अपडेट! 10 तोळं सोनं एका दिवसात 2,700 रुपयांनी महाग, वाचा 24K, 22K, 18K सोन्याचे नवीन भाव

SCROLL FOR NEXT