Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Mira Road Crime News: मिरा रोडमध्ये शाळकरी मुलीवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.

Priya More
  • मिरा रोडमध्ये सामूहिक बलात्काराची घटना समोर

  • नववीच्या विद्यार्थिनीवर ६ जणांकडून बलात्कार

  • कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

  • २ आरोपींना अटक करण्यात आली तर इतरांचा शोध सुरू

मनोज तांबे, मिरारोड

मुंबईत १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईनजीकच्या मिरारोडमध्ये ही घटना घडली. पीडित मुलीचा अश्लिल व्हिडीओ काढून आरोपी तिला तो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होते. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात सहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. तर उर्वरीत ४ आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती नववीमध्ये शिक्षण घेत आहे. ती मिरा रोडमध्ये आईसोबत राहते. जून महिन्यात २५ वर्षांच्या आरोपीने तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढला होता. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर बलात्कार करू लागला. मात्र, हा प्रकार तिथेच थांबला नाही. आरोपीने हा व्हिडिओ त्यानंतर २६ आणि २८ वर्षांच्या दोन मित्रांना पाठवला. त्यांनी या व्हिडिओच्या आधारे पीडित मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर अन्य ३ आरोपींकडे हा व्हिडिओ गेला आणि त्यांनी देखील या व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेलिंग केले. या तिघांनी देखील तिला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी ६ जणांविरोधात पोक्सो, बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी २५ ते २८ वर्षे वयोगटातील आहेत.

या घटनेमुळे मिरारोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी हे कृत्य केले असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. आम्ही आतापर्यंत २ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली. सध्या पोलिस या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Food For Weight Loss: वजन कमी करायचं आहे? मग पुढचे ३० दिवस हे पदार्थ खाऊ नका

पोलीस स्टेशमध्ये आदित्य,अमितचा 'ठाकरेबाणा', जीपच्या टपावर उभं राहत सरकारला दिला इशारा| Photos

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार की थेट ₹४,००० जमा होणार? कुणाला मिळणार डबल पैसे? पाहा अपडेट

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

SCROLL FOR NEXT