13 Years Old Boy Physically Assaulted Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई पुन्हा हादरली, धार्मिक शिक्षण संस्थेत १३ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

13 Years Old Boy Physically Assaulted: मुंबईमध्ये एका धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झालेत. मुंबईतल्या कांदिवली भागामध्ये ही घटना घडली.

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (Physically Assaulted) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धार्मिक शिक्षण संस्थेमध्येच या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अल्पवयीन आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. आरोपी मुलाची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये एका धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झालेत. मुंबईतल्या कांदिवली भागामध्ये ही घटना घडली. अत्याचार करणाऱ्या १५ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे.

पीडित मुलाने आपल्या आईला घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिकत होता. त्याच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलाने २६ मे रोजी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

या घटनेप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधत गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे या मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलावर २१ ऑगस्टला देखील लैंगिक अत्याचार झाले होते. पण हे अत्याचार कोणी केले याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT