Pankaja Munde’s PA Anant Garje Wife End Life Saam Tv
मुंबई/पुणे

Anant Garje: अनैतिक संबंध, मोबाइलवर चॅटिंग; समजूत काढूनही तीच चूक; बायकोच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेंवर गंभीर आरोप

Pankaja Munde’s PA Anant Garje Wife End Life: मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या बायकोने राहत्या घरी गळफास घेत आत्मह्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांच्यावर त्यांच्या सासरच्या मंडळींनी गंभीर आरोप केले आहेत.

Priya More

Summary -

  • पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या बायकोने केली आत्महत्या

  • वरळीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली

  • गौरी पालवे यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

  • कुटुंबीयांनी अनंत गर्जेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या बायकोने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. मुंबईतल्या वरळीमधील राहत्या घरी शनिवारी संध्याकाळी सात वाजता डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. गौरी यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गौरी यांच्या कुटुंबीयांनी वरळी पोलिस ठाण्यात धाव घेत अनंत गर्जे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचे फेब्रुवारी महिन्यांमध्येच लग्न झाले होते. गौरी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची बायको गौरी पालवे यांनी शनिवारी आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनंत गर्जे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपुरी येथील रहिवासी आहेत. तर त्यांची बायको डॉक्टर गौरी पालवे या बीडच्या रहिवासी होत्या. ७ फेब्रुवारीला दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. या लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती.

गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. पण ही आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरी यांच्या मामाने अनंत गर्जे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अनंत आणि गौरी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघे सतत भांडण करत होते. अनंत गर्जे यांचे बाहेर प्रेमसंबंध होते. याबाबत गौरीला कळाले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होता. गौरीने अनंत यांच्या या चुकीला माफ करत पुन्हा असं करू नका असे सांगितले होते.

गौरीने समजावल्यानंतरही अनंत गर्जे मोबाइलवर सतत चॅटिंग करत होते. याबाबत गौरीने वडिलांना सांगितले होते. तिने चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट देखील शेअर केले होते. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशी दोघांमध्ये याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तिने वडिलांना फोन देखील केला होता. भांडणादरम्यान तिने अनंत गर्जेला आयुष्य संपवून टाकेल असे सांगितले होते. गौरी आत्महत्या करत होती त्यावेळी अनंत गर्जे घरामध्येच होते.

गौरीने आत्महत्या केल्यानंतर अनंत गर्जेंनी तिला दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. तोपर्यंत अनंत गर्जे तिथेच होते त्यानंतर ते निघून गेले. घटनेची माहिती मिळताच आम्ही सगळे जण बीडवरून आलो. आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. अनंत गर्जेंविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गौरी यांच्या मामाने केली आहे. सध्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT