Mumbai Crime Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक! दोघांना अटक, मेघवाडी पोलिसांची कारवाई

Crime News: विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक! दोघांना अटक

Satish Kengar

>> संजय गडदे

Mumbai Crime Latest News: विदेशात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या टोळीचा मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन जणांना मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून यातील एक आरोपी नायजेरियन वंशाचा असून दुसरा आरोपी भारतीय आहे. चुका ज्युलियन इजणीदो (३५ वर्षे) अनुज हरीप्रसाद नाईक (२७ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता विल्सन दुस्कानो यांना कॅनडा या देशात हिल्टन कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी कडून एक लाख साठ हजार रुपये उकळले. फिर्यादी श्वेता यांना नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्या संदर्भात श्वेता दुष्कानो यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीं विरोधात कलम ४१९, ४२०, भादंवि सहकलम ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. (Latest Marathi News)

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ क्र. १० चे डीसीपी महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तांत्रिक तपास व फिर्यादीने रक्कम भरलेल्या बँक खात्याची माहिती घेऊन ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर मेघवाडी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक दिल्ली किसनगड येथे पाठवले. (CRIME NEWS)

तपास पथकाने गुन्हयातील मुळचा नायजेरीया देशातील आरोपी चुका ज्युलियन इजणीदो (३५ वर्षे) अनुज हरीप्रसाद नाईक (२७ वर्षे) यांना ताब्यात घेवून सखोल विचारपूस करून फसवणुकीच्या गुण्या प्रकरणी अटक केले.

आरोपींकडून अॅप्पल, सॅमसंग, रेडमी असे ३ महागडे मोबाईल हॅन्डसेट, बंधन बँक, सेन्ट्रल बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक इंडीया, इंडसइंड बँक इ. बँकांचे डेबीट कार्डस, एअरटेल, जिओ, आयडीया व्होडाफोन या कंपन्यांचे सिमकार्ड, ईलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड व रोख रक्कम ८२,०००/- रु. असा एकूण १,३२,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT