Fake Godman Physical Abused Woman Saam Tv
मुंबई/पुणे

मी शंकर तू पार्वती; गोड बोलून महिलेला लॉजमध्ये नेलं अन्...; खरातनंतर आणखी एका स्वयंघोषित गुरुचा कारनामा उघड

Fake Godman Physical Abused Woman: वसईतील एका स्वयंघोषित बाबानं फेसबुकवरून मैत्री करून पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • वसईतील भोंदू बाबाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

  • फेसबुकवरून ओळख करून महिलेला फसवलं

  • गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा आरोप

अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरूनं महिलेवर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे. ‘मी शंकर, तू माझी पार्वती, असं म्हणत महिलेला आपल्या जाळ्यात ओढत तिच्यावर अत्याचार या स्वयंघोषित गुरूनं केला आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 35 वर्षीय पीडित महिला पुण्यातील आहे. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये फेसबुकवर तिची ओळख झाली होती. आमची वसई या संस्थेचा प्रमुख असलेल्या या धर्मगुरूने पीडित महिलेच्या धार्मिक शद्धेचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला होता. मी महादेवाचा अवतार आहे. 'तू माझी पार्वती आहेस, असे सांगून महिलेला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरीमधील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेचे काही अश्लील फोटोही काढली.

या फोटोवरून तो त्या महिलेला ब्लॅकमेल करायचा. या नराधम बाबाने मे २०२५ मध्ये महिलेला वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत करत आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT