Badalapur Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Badalapur Crime News: दोन दिवसांत गूढ उकललं! बदलापूरमध्ये विवाहितेची पतीनेच केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर...

Badalapur Crime Update: दोन दिवसांनी पोलिस तपासात हा संशय खरा ठरला असून पतीनेत पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

अजय दुधाणे

Badalapur Crime: दोन दिवसांपूर्वी बदलापूर (Badalapur) शहरात विवाहित महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला होता. अखेर दोन दिवसांनी पोलिस तपासात हा संशय खरा ठरला असून पतीनेत पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकात राऊत आर्केड नावाची इमारत आहे. या इमारतीत राजश्री गणेश भोसले ही ३५ वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलासह वास्तव्याला होती. गुरूवारी दुपारच्या सुमारास ही महिला घरात मृतावस्थेत आढळून आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राजश्रीची हत्या ही तिच्या पतीने गणेश भोसले यानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अखेर तो तो संशय खरा ठरला आहे.

या घटनेचा तपास करताना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग लागलीच तपासाला लागली,यावेळी पोलिसांच्या हाती एक सी सि टी व्ही लागला,त्यात मृत महिलेचा नवरा घरातून बाहेर जाताना दिसला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गणेशला कल्याण रेल्वे स्थानकावर अटक केली.

त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर गणेशने स्वता हत्या केल्याची कबुली दिली. चारित्रीच्या संशयावरून त्याने पत्नीला संपविले असल्याचेही आरोपीने सांगितले आहे. तसेच त्याची पत्नीसुद्धा त्याच्यावर संशय घ्यायची, म्हणून रागाच्या भरात हे कृत्य केल्याचेही समोर आले आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT