Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! कुर्ल्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

Kurla Firning Case: कुर्ल्यामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची भयंकर घटना घडली. पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

मयूर राणे, मुंबई

मुंबईमध्ये भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. कुर्ल्यातील हलाव पुलाजवळ एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणावर ३ गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोन गटातील वादातून ही गोळीबाराची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. बी. नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली. मकडवाला कंपाउंड येथील हलाव पुलाजवळ तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. आज दुपारी सुमारे १२:४० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून विनोद मल्लाप्पा पवार (वय ४० वर्षे) यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेन कुर्ला परिसर हादरून गेला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विनोद पवारवर ३ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या विनोदला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. विनोदची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच व्ही. बी. नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2027 आधी संघांमध्ये मोठी अदलाबदल; हार्दिक पंजाबकडून खेळणार, अर्शदीप मुंबईच्या ताफ्यात!

Maharashtra News Live Update: फटाक्यांच्या वादातून तामसईमध्ये कुटुंबाला बेदम मारहाण; लाकडी दांडक्याने हल्ला

HDFC Bank चा ग्राहकांना झटका! MCLR मध्ये १५ बेसिस पॉइंट्सची वाढ; आता होम लोन महागणार?

PM Kisan Voter ID : शेतकरी आणि पेन्शनधारकांनो लक्ष द्या! PM Kisan च्या पैशांसाठी नवीन नियम येणार

भाऊबीजेला बहिण भावाला नारळ आणि करगोटा का देते?

SCROLL FOR NEXT