Mumbai Crime Saam T
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत उबर चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन, आधी शिवीगाळ नंतर मारहाण; घटनेचा CCTV व्हिडिओ

Uber Driver: गोरेगावमध्ये उबर बाईक चालकाने महिला प्रवाशाला शवीगाळ करत मारहाम केल्याची धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर आरोपी चालक फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या २० मिनिटांत त्याला अटक केली.

Priya More

संजय गडदे, मुंबई

गोरेगावमध्ये महिला प्रवाशासोबत उबर बाईक चालकाने गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या चालकाने आधी महिला प्रवाशाला शिवीगाळ केली नंतर तिला मारहाण केली. सतर्क भाजप कार्यकर्त्यांमुळे मोठा अनर्थ टळला. महिला प्रवाशाला मारहाण करून चालक फरार झालेला. उबेर बाईक चालकाला वनराई पोलिसांनी २० मिनिटांत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी मोबाइल ॲपद्वारे उबर टॅक्सी बाईक बुक करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले. बाईक चालकाने या तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवर ड्रॉप केले. त्यानंतर त्याने तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडला.

उबर चालक या तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे पाहून त्या ठिकाणी सतर्क भाजप कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून तरुणीला सोडवले. मात्र संधीचा फायदा घेत उबर बाईक चालक फरार झाला. याप्रकरणी तरुणीने वनराई पोलिस ठाण्यात उबर टॅक्सी बाईक चालकाविरोधात तक्रार दिली.

याप्रकरणी वनराई पोलिसांनी आरोपी उबर टॅक्सी बाईक चालकाला अवघ्या २० मिनिटांत अटक केली. मात्र अशा चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच उबेर, ओला, झेप्टो आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांनी कामावर ठेवले पाहिजे, असे मत गोरेगाव भाजप उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी व्यक्त केले आहे. ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

SCROLL FOR NEXT