26/11 मुंबई हल्ला प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड तहाव्वूर राणाला विरोधात मुंबई गुन्हे शाखेकडून ४०५ पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्याला भारतात आणण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
मूळ पाकिस्तानी असलेला तहाव्वूर हा कॅनडाचा नागरिक आहे. त्याने दहशतवादी हेडलीसोबत मुंबई हल्ल्याचा कट रचला होता. या आरोपाअंतर्गत भारत सरकारच्या मागणीवरून तहाव्वूरला अमेरिकेने अटक केली होती.
भारताने १० जून २०२० रोजी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच या प्रकरणात भारत आणि अमेरिकेत प्रत्यार्पण करार झाला आहे. त्यानुसार त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी देखील मिळाली आहे.
यानंतर आता या तहाव्वूर विरोधात मुंबई गुन्हे शाखेने ४०५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २६/११ मुंबई हल्ला प्रकरणी चौथं आरोपपत्र दाखल केलं आहे.
पाकिस्तानी लष्करात डॉक्टर असलेला तहाव्वूर राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तय्यबाचा हस्तक आहे. तो ११-२१ नोव्हेंबर २००८ साली भारतात आला होता. तर २०-२१ नोव्हेंबरला तो मुंबईत होता. त्याच्यावर दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीला सहकार्य केल्याचा आरोप आहे.
कॅनडाचा नागरीक असलेला तहाव्वूर राणा हा सध्या पत्रकाराच्या हत्ये प्रकरणी अमेरिकेच्या कारागृहात आहे. भारत आणि अमेरिकेतील करारातर्गंत लवकरच त्याचं प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.