Mumbai Crime News SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींमध्ये बॉयफ्रेंड असल्याची माहिती उघड

Mumbai Crime News : मुंबईत १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडलीय.

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबई सामूहिक अत्याचाराच्या घटनेने हादरली. लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. यातील एका आरोपीसोबत पीडितेचे प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. (Crime News)

मुंबईच्या लोअर परळ परिसरात पीडित मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. वरळी येथून मुलीला तरुणाने लोअर परळ येथे घरी आणले. तिथे आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. ज्या तरुणाने तिला घरी आणले, त्याच्यासोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Mumbai News)

पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. तर आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सहा आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन

मुंबईतील लोअर परळ परिसरात १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा आरोपींपैकी तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या तिघांनाही डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्ह्यांची नोंद केली आहे. प्रौढ असलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT