Sakinaka Update: एक महिन्यात तपास पूर्ण करणार- पोलीस आयुक्त हेमंत नगराळे Saam Tv
मुंबई/पुणे

Sakinaka Update: एक महिन्यात तपास पूर्ण करणार- पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

मुंबईतील साकीनाका परिसरता अत्यंत अमानुष पणे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात (Sakinaka Rape Case) अत्यंत अमानुष पणे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साकीनाकामधील खैरानी रोड या परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा अतिस्रावामुळे उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे. या प्रकरणासंददर्भात अधिक माहिती देण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. यामध्ये त्यांनी आतापर्यंत घटनेसंदर्भातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

"शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री साधारण 3:20 वाजेच्या सुमारास साकिनाका परिसरात ही घटना घडली. एका बाईला जबर मारहाण सुरु असल्याची माहिती वॉचमनने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस कंट्रोल रुमने संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्या ठिकाणी एका उघड्या टेम्पोत ती महिला जखमी अवस्थेत आढळली. पोलिसांनी स्वतः त्या महिलेला घेऊन राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्वरित डॉक्टरांनी त्या महिलेवर उपचार सुरु केले."

यानंतर, पोलिसांनी चौकशी सुरु केली. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्हीच्या फुटेजमधून संशयिताचा तपास सुरु केला आणि काही तासातच ताब्यात घेण्यात आले. परिसरातील सीसीटिव्ही फूटेज द्वारे उत्तरप्रदेश जौनपूरच्या मोहन चौहानला अटक केली. मोहनच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळून आले.

न्यायालयाने त्या आरोपीला 21 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी दिली. पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी दिली आहे. तसेच एका महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी हेमंत नगराळे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल. महिलेचा उपचार सुरु असतानाच ती दगावली. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने हत्येचं कलमही वाढवलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेज नुसार या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही म्हणून गुन्ह्यातील कलम काढलेलं आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. मात्र लवकरच वस्तूस्थिती समोर येईल. तपास लवकरात लवकर पुर्ण होईल अस त्यांनी सांगितलं.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, महिलेला परत आणून दिला दागिना

Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

laughter chefs 3: सहा महिन्यांतच 'लाफ्टर शेफ्स'च्या नव्या सीझनची सुरुवात; 'हे' फेमस स्टार्स लावणार कॉमेडीचा तडका

Maharashtra Live News Update: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

SCROLL FOR NEXT