Mumbai Costal Road Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Costal Road: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार; कोस्टल रोड आता सी-लिंक रोडला जोडणार

Coastal Road Connect To Sea Link: मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. आता कोस्टल रोड सी-लिंक रोडला जोडला जाणार आहे.

Rohini Gudaghe

सुरज मसुरकर, साम टिव्ही मुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये वाहतूक कोंडींची समस्या आता कमी होणार आहे. कारण आता कोस्टल रोड (Mumbai Costal Road Update) सी-लिंक रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. सी-लिंकवरुन (Sea Link Road) थेट दक्षिण मुंबईत प्रवेश करता येणार आहे. या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत आलं, हे जाणून घेऊ या.

कोस्टल रोड (Mumbai Costal Road) आता सी लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कोस्टल रोडवरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता वाहतूक कोंडी देखील कमी होणार असल्याची शक्यता आहे. या पुलाचं काम सध्या चांगलंच वेगाने सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसात गर्डर बसवण्याचं काम पूर्ण होणार आहे.

बोर गार्डन हा संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर पुढील 100 वर्षे टिकेल, इतका मजबूत केला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात हा गर्डर बसवण्यात येणार (Coastal Road Connect To Sea Link) आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील भरती आणि आहोटीच्या वेळा पाहूनच ही सगळी कामे करण्यात येणार आहेत. 336 मीटर एवढा लांब असलेल्या या गर्डरमुळे आता कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक यांतील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

हा गर्डर २००० मेट्रिक टनचा आहे. संपुर्ण गर्डर जपानी तंत्रज्ञानाने कोटिंग केलेला (Costal Road Update) आहे. पुढील २५ ते ३० वर्ष गंज पकडणार नाही. पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत गर्डर आहे. माझगाव डॉक येथे गर्डरची बांधणी झाली आहे, ही या गर्डरची खास वैशिष्ट्ये आहेत. सी-लिंकवरुन करता येणार थेट दक्षिण मुंबईत प्रवेश करता येणार (Mumbai News) असल्यामुळे वेळेत बचत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT