Mumbai contractor news today साम टीव्ही
मुंबई/पुणे

Mumbai : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने टोकाचे पाऊल उचललं, खळबळजनक कारण आले समोर

Mumbai Contractor End Life : मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी प्रलंबित बिलांच्या पैशांसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Bharat Mohalkar

Mumbai contractor news today : मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या एका कंत्राटदाराने (कॉन्ट्रॅक्टर) टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईतील व्यावसायिक वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

काम पूर्ण झाल्यानंतरही बिलाचे पैसे मिळाले नाहीत. वारंवार देवकाते यांनी थकीत बिलाचे पैसे मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या चकरा मारल्या. पण त्यांना पैसे मिळाले नाही. वाढता आर्थिक खर्चामुळे कंत्राटदार देवकाते यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी लिहिलं देवकाते यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलयाचीही माहिती समोर आली आहे. काम केले तरी वेळेत बिल मिळाली नाहीत, त्यामुळे देवकाते त्रस्त होते. बिल मिळण्यासाठी १० वेळा चक्कर मारावी लागत असल्याचा उल्लेख देवकाते यांनी पत्रात केला होता.

दरम्यान, प्रलंबित बिलांच्या तणावातून मुंबईतील ठेकेदार देवकते यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने शासन व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाची टीप:

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया त्वरित तज्ज्ञांशी किंवा हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर पर्याय नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Raksha Bandhan 2026: भावाला राखी बांधताना ३ की ५, किती गाठी बांधाव्यात? जाणून घ्या

Akola : शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; FDAची राज्यभर मोहीम, अकोल्यात १,८४७ शिक्षकांना प्रशिक्षण

Raksha Bandhan 2026: लग्न झाल्यानंतर भाऊ-बहिणीच्या नात्यात अचानक दुरावा का निर्माण होतो? यामागची खरी कारणं जाणून घ्या

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा भाव

SCROLL FOR NEXT