Sewri Nhava Sheva Trans Harbour Link Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Trans Harbour Link: शिवडी-नाव्हाशेवा सी-लिंकवर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी द्या; काँग्रेसची मागणी, शिंदे सरकार काय निर्णय घेणार?

varsha gaikwad on Mumbai Trans Harbour Link: MTHL पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार होणार आहे. या पुलाच्या लोकार्पणाआधीच काँग्रेसने मोठी मागणी केली आहे.

Vishal Gangurde

Sewri Nhava Sheva Trans Harbour Link:

देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पाचे येत्या १२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरातील अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार होणार आहे. या पुलाच्या लोकार्पणाआधीच काँग्रेसने मोठी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसची सरकारकडे मागणी

काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी शिवडी -नाव्हाशेवा सी-लिंकच्या लोकार्पणाआधीच शिंदे सरकारकडे मोठी मागणी केली आहे. 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी आणि बससाठी वेगळ्या लेनची तरतूद असली पाहिजे, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा नाव्हाशेवा-शिवडी पुल तयार झाला आहे. या ब्रिजची संकल्पना विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना मांडली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी या ब्रिजच्या प्रोजेक्टला मंजुरी दिली होती. महाविकास आघाडीने या प्रोजेक्टला भरघोस निधी दिला होता'.

'सार्वजनिक वाहतुकीला परवानगी द्यावी'

'आता आमची अपेक्षा हीच आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून या पुलाचं उद्घाटन केलं नाही. आता देशाचे पंतप्रधान येणार असल्याने सुशोभीकरण सुरु आहे. आता आमची मागणी आहे की, हा पुल लवकरात लवकर सुरु करावा. दुसरं आमचं म्हणणं आहे की, या पुलावर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी द्यावी. त्यांच्यासाठी वेगळी लेन द्यायला हवी, असे त्या पुढे म्हणाल्या.

'आधी टोल ५०० रुपये होता. त्यानंतर २५० रुपये करण्यात आला. मात्र, सर्वसामान्यांच्या सार्वजनिक वाहतुकीला कोणताही टोल आकारण्यात येऊ नये. येणाऱ्या काळात २५० रुपयांचा टोल आणखी कमी करण्यात यावा, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

SCROLL FOR NEXT