A fallen tree crushes a school bus in Mumbai’s Chembur area, leaving one student dead and several injured. saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, महापालिकेच्या निष्काळजीपणाचा बळी

Chembur Tragedy: चेंबूरमध्ये एका धावत्या स्कूल बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळलाय. यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. मात्र, ही दुर्घटना नेमकी कशी घडली? आणि प्रत्यक्षदर्शीनं नेमकं काय सांगितलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

मुंबईत मरण किती स्वस्त झालंय याचं आणखी एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना चेंबूरमध्ये घडलीय. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर एका धावत्या स्कूल बसवर झाड कोसळून भीषण अपघात घडलाय. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. ही दुर्घटना नेमकी कशी घडली ते पाहूयात.

नेमकं काय घडलं?

चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर स्कूल बसवर झाड कोसळलं

बसमध्ये 14 ते 15 विद्यार्थी असल्याची माहिती

10 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

जखमींपैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

रुग्णवाहिका, जेसीबी, बचाव पथकाकडून रेस्क्यू

ही घटना कशामुळे घडली ऐकूयात प्रत्यक्षदर्शीकडून

ऐकलंत...कॉक्रिटीकरणामुळे ते झाड कमकुवत झालं होतं...मात्र झाडांचं सर्वेहक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या ना कंत्राटदारांनी हे पाहिलं....ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी...कारण सर्व केवळ टक्केवारी आणि हप्तेखोरीत गुंतलेले आहेत.

आता महापौरांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून अशा झाडांबाबत नव्यानं धोरण आखण्याचं आश्वासन दिलंय.

'साम' टीव्हीचे सवाल

पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं नव्हतं का?

संबंधित कंत्राटदाराने झाडाची योग्य छाटणी का केली नाही?

काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळे कमकुवत होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं?

बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का?

खरंतर, दरवर्षी महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामं केली जातात. यासाठी महापालिकेकडून कोट्यवधींचा निधीही खर्च केला जातो. मुंबईसह उपनगरात रस्त्यावरील वृक्षांची छाटणी करण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र ते केवळ कागदावरच असतात..फिल्डवर या ढिसाळ कामांमुळे सामान्य जनतेला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या विद्यार्थ्याचे मारेकरी ठरलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हायलाच हवी....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT