Mumbai Crime News In Marathi  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : आई अन् मुलीला बघून करायचा अश्लील चाळे, ५९ वर्षीय नराधमाचं कृत्य असं झालं उघड

Mumbai Crime News In Marathi : मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोप परिसरात अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला बघून अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे, मुंबई

Mumbai Crime News In Marathi : मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोप परिसरात अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला बघून अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक करण्यात आली. तीन वर्षांपासून संशयित आरोपी हे कृत्य करत होता. अटक केलेल्या आरोपीचे वय ५९ वर्षे आहे. (Crime News In Marathi)

मुंबईच्या चारकोप पोलिसांनी (Mumbai Police) ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मागील ३ वर्षांपासून हे कृत्य करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ४६ वर्षांची आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात ती १६ वर्षांच्या मुलीसोबत राहते. आरोपीने पीडित महिलेला पाहून यापूर्वी अश्लील कृत्य केले होते. पण महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपी हा तक्रारदाराच्या समोरच्या घरात राहतो. गेल्या आठ वर्षापासून तिथे वास्तव्यास आहे. मागील ३ वर्षांपासून तो हे कृत्य करत होता.

अल्पवयीन मुलीने या सर्व प्रकाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसांपूर्वीच आरोपीने पीडित मुलीला पाहून पुन्हा अश्लील चाळे केल्याचे तिने सांगितले. या प्रकाराने त्रस्त झालेल्या महिलेने अखेर पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा कलम १२ अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानुसार पोलिसांनी ५९ वर्षीय आरोपीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. १ मे २०२० पासून १४ मे, २०२३ या कालावधीत आरोपी हा प्रकार करत होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT