Mumbai chain snatching gang saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत सहा ठिकाणी सोनसाखळी चोरी; राजस्थान कनेक्शन उघड, १९ गुन्ह्यांची धक्कादायक माहिती

Mumbai Chain Snatching Gang Arrested In Rajasthan: मुंबईच्या पश्चिम उपनगरात महिलांच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांनी राजस्थानमधील भिलवाडा येथे पर्दाफाश केला. पोलिसांनी सात सोन्याच्या चेन जप्त केल्या असून वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी आणि शिवाजी पार्कमधील सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या पश्चिम उपनगरात दुचाकीवरून फिरत महिलांच्या सोनसाखळ्या चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना वांद्रे पोलिसांनी राजस्थानमधील भिलवाडा येथून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७ लाख १७ हजार ५२० रुपये किमतीच्या, ६५ ग्रॅम ९७० मिली वजनाच्या एकूण सात सोन्याच्या चेन हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे मुंबईतील सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास एका ४८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जबरीने खेचून पळ काढला होता. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून १७ नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वांद्रे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन्ही आरोपी राजस्थानमधील भिलवाडा येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींनी मुंबईत विविध ठिकाणी दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी १७ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील भिलवाडा येथे रवाना झाले. भिलवाडा येथे शोध घेत असताना एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला भिलवाडा येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. पुढील तपासात त्याच्या साथीदारासह मुंबईतील वांद्रे, विलेपार्ले आणि अंधेरी परिसरात सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान आरोपींनी आपल्या साथीदारासह मुंबईत सोनसाखळी चोरी केल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित बालकाला ताब्यात घेऊन भिलवाडा येथील बाल न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्याला मुंबईत आणून डोंगरी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ६५ ग्रॅम ९७० मिली वजनाच्या सात सोन्याच्या चेन हस्तगत केल्या असून त्यांची किंमत ७ लाख १७ हजार ५२० रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या हस्तगत केलेल्या मुद्देमालाच्या आधारे वांद्रे पोलीस ठाण्यातील एक, विलेपार्ले पोलीस ठाण्यातील तीन, अंधेरी पोलीस ठाण्यातील एक आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशेष म्हणजे, अटक आरोपींविरोधात मुंबई आणि राजस्थान येथे जबरी चोरी, चोरी, खुनाचा प्रयत्न, दुखापत आदी स्वरूपाचे एकूण १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र सातुंडे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

Pune Crime : बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये सुरू होता तंबाखूचा कारखाना, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त,पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई

तुमचं गॅस कनेक्शनही बंद होणार? देशातील 75 लाख ग्राहकांची संख्या घटली

Kitchen Vastu Tips: किचनच्या ओट्यावर चुकूनही ठेवू नका 'या' ७ वस्तू; नाहीतर, घरात होऊ शकते पैश्याची तंगी

Bank Loan : कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक कोणाकडून वसूल करणार पैसे? वाचा महत्त्वाचा नियम

SCROLL FOR NEXT