Heavy rain lashes Mumbai and Raigad; Central Railway trains delayed by 15–20 minutes due to return monsoon impact. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: परतीच्या पावसानं बिघडवलं रेल्वेचं वेळापत्रक; मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

Mumbai Central Railway: मुंबई, रायगड आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. परतीच्या मान्सूनच्या पावसामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Bharat Jadhav, मयुरेश कडव

  • परतीच्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

  • रायगड, बदलापूर आणि मुंबईत जोरदार पाऊस

  • रेल्वे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने जोर धरलाय. रायगड आणि मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात जोदार पाऊस होतोय. बदलापुरातही तासाभरापासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. परतीच्या पावसाने रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.

हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होता, त्या इशाऱ्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसापासून बदलापूर अंबरनाथ तसेच ग्रामीण पट्ट्यात सतत पाऊस पडत आहे. आजही दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांसोबत व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलाय. मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. तर भात पिकाचंही अतोनात नुकसान झालंय .

रायगडमध्ये जोरदार पाऊस

रायगडमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. सलग आठवडाभरापासून परतीच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर वाढत असल्याने भात पिकं धोक्यात आले आहे.अनेक ठिकाणी भाताचे पिक शेतात साठलेल्या पाण्यात पडल्याने खराब होण्याची भिती आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्याने भात कापणीच्या कामांचा खोळंबा झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

SCROLL FOR NEXT