Heavy Rain : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार; शेतीचे मोठे नुकसान

Nashik News : पावसाच्या पाण्यामुळे विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात नद्यांचे पाणी शिरल्याने उभ्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

अजय सोनवणे
मनमाड (नाशिक)
: उत्तर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या पूर्व भागात काल रात्रीच्या सुमारास झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यातच जिल्ह्यातील गोळेगाव, गोंदेगाव आणि मरळगोई परिसरात पावसाचा जोर अधिक होता. मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी बंधारे फुटल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरले आहे. या पावसाच्या पाण्यामुळे विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात नद्यांचे पाणी शिरल्याने उभ्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Heavy Rain
Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट; दोन दिवसांच्या पावसामुळे चांदसैली घाटात कोसळली दरड

मदत येण्यापूर्वीच नुकसान 

दरम्यान पावसाळ्यात सततच्या पावसामूळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला शून्य उत्पादन आले असून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. तर सरकारकडून सरसकट मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र अनेक शेतकऱ्यांना मदतीचा निधी मिळालेला नाही. अशात पुन्हा पावसामुळे नुकसान झाले. दरम्यान प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Heavy Rain
Kartiki Ekadashi : विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; कार्तिकी एकादशीची तयारी, विठ्ठलाचे राजोपचार झाले बंद

ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दानदान उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले शेकडो क्विंटल सोयाबीन भिजले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाले असून सोयाबीनला भाव नाही. त्यात पावसाने सोयाबीन भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com