Kartiki Ekadashi : विठुरायाचे २४ तास दर्शन सुरू; कार्तिकी एकादशीची तयारी, विठ्ठलाचे राजोपचार झाले बंद

Pandharpur News : अवघ्या आठ दिवसांवर कार्तिकी एकादशी असल्याने आतापासून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे विठ्ठल मंदिर समितीने मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Kartiki Ekadashi
Kartiki EkadashiSaam tv
Published On

पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्ताने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. आगामी दिवसात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आजपासून विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले आहे. यामुळे परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद करण्यात आले असून चोवीस तास दर्शनामुळे भाविकांना याचा तात्काळ दर्शन घेता येणार आहे. 

पंढरपूरच्या प्रमुख यात्रांमधील एक असलेली कार्तिकी एकादशी येत्या २ नोव्हेंबरला आहे. आषाढी यात्रेनंतर येत असलेल्या कार्तिकी एकादशीला देखील मोठ्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. अवघ्या आठ दिवसांवर कार्तिकी एकादशी असल्याने आतापासून भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे विठ्ठल मंदिर समितीने मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Kartiki Ekadashi
Rain : परतीच्या पावसाचा फटका; कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यात १०० टक्के भात शेती वाया

९ नोव्हेंबरपर्यंत मंदिर खुले 

आषाढीनंतर २ नोहेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकीच्या सोहळ्यासाठी विठोबा भक्तांना २४ तास दर्शन देणार आहे. हे २४ तास दर्शन ९ नोव्हेंबर रोजीच्या प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू असणार आहे. अर्थात पुढील पंधरा दिवस वितठूरायाचे दर्शन २४ तास घेता येणार असून या काळात परंपरेप्रमाणे विठ्ठलाचा पलंग काढून सर्व राजोपचार बंद करण्यात आले आहेत. 

Kartiki Ekadashi
Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात येलो अलर्ट; दोन दिवसांच्या पावसामुळे चांदसैली घाटात कोसळली दरड

संत गोरोबाकाकाची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ
धाराशिव : वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा काका यांची पालखी तेर येथुन कार्तिक एकादशीच्या वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. आज धाराशिव शहरात संत गोरोबा कुंभार यांच्या पालखीचे फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तर गोरोबाकाकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी दुःख विसरून शेतकरी वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आतुर झालेला पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com