Mumbai Mega Block on November 3: भाऊबिजेला मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलवर आज मेगा ब्लॉक नसेल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात मुंबईतील मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य देत मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय. आवश्यक देखभालीसाठी प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक रेल्वेकडून घेण्यात येतो, त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत होतात. तसेच मुंबईकरांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. पण दिवाळीत आलेल्या रविवारी मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलाय. (Mumbai: Central Railway announces no mega block on Main and Harbour Lines )
दिवाळी बोनस न आल्यामुळे बेस्ट बस सेवा बंद आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रासाचा सामना करावा लागणार होता, पण त्यात आता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात आला नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी लोकल सुरु असल्यामुळे सुट्टीच्या दिवाळीच्या दिवळी घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिलालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.