Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: अनैतिक संबंधातून मुंबईतील व्यावसायिकाची हत्या, मृतदेह मुळशी तालुक्यात फेकला; चौघांना अटक

Pune Crime News: ओळखीच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुंबईतील एका व्यावसायिकाचा खून करण्यात आला. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह मुळशी तालुक्यातील एका झुडपात टाकला.

Satish Daud

Pune Latest Crime News

ओळखीच्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मुंबईतील एका व्यावसायिकाचा खून करण्यात आला. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह मुळशी तालुक्यातील एका झुडपात टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत ४ आरोपींना अटक केली आहे. ज्यो मॅन्युअल परेरा (रा. कलिना, मुंबई) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पोलिसांनी (Police) अशोक महादेव थोरात (वय ३५, रा. एनडीए रस्ता, वारजे), गणेश साहेबराव रहाटे (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), धीरज ऊर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय ४०, रा. हरकानगर, भवानी पेठ), योगेश दत्तू माने (वय ४०, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) यांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी साळुंके हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध खून, अपहरण, खंडणी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यो परेराचा मत्स्य विक्रीचा व्यवसाय असून त्याचे आरोपीच्या ओळखीच्या एका महिलेशी अनैतिक संबध होते.

प्रेमसंबधातून परेरा हा महिलेला त्रास देत होते. महिलेने हा प्रकार आरोपीला सांगितला. त्याने आरोपी माने साथीदारांसमवेत २० डिसेंबरला मुंबईला गेला. तिथे आरोपींनी परेरा याची तीक्ष्ण हत्याराने वार (Crime News) करून हत्या केली.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी मोटारीत परेराचा मृतदेह घेऊन मुळशी तालुक्यात आले. पुणे-कोलाड रस्त्यालगत गोणवडी गावाजवळ एका झुडपात मृतदेह टाकून ते पसार झाले. याबाबत पौड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT