Breaking News Mumbai  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai News: शिवडीत मोठी दुर्घटना! गटार लाईनची सफाई करताना श्वास गुदमरून एकाचा मृत्यू; ५ जखमी

Sewari News: शिवडीत गटार लाईनची साफ सफाई करताना श्वास गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. २४ मार्च २०२४

Sewri Breaking News:

मुंबईमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. शिवडीत गटार लाईनची साफ सफाई करताना श्वास गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जखमी झाले आहेत. अलाम ईस्माइल अली असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवडी विअर हाऊसच्या पाठीमागे गाडी अड्डा येथे महानगर पालिकेने एका खासगी कंत्राटदाराला भूमिगत गटार सफाईचे कंत्राट दिले होते. आज या ठिकाणी गटार लाईन साफ-सफाईचे काम सुरू होते. गटार साफ करताना गटारातील दुषीत पाणी यंत्रणेद्वारे वेगाने सोडत असताना अलाम ईस्माइल अली हा कामगार प्रवाहाच्या दाबामुळे गटारात पडला.

अली पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या इतर सहकाऱ्यांनीही गटारात उडी घेतली. सहकाऱ्यांनी अलीला बाहेर काढत त्याला परळच्या के. ईएम (K. EM Hospital) रुग्णालयात नेले असता याठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेत इतर पाच सहकारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HAL Recruitment: हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT