Who Is Bhavesh Bhinde From Ghatkopar Petrol Pump Case Saam Tv
मुंबई/पुणे

Ghatkopar Hording Collapse: धक्कादायक! घाटकोपर दुर्घटनेतील इगो मीडिया कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग्स; पालिकेचा कारवाईचा इशारा

Ghatkopar Hording Collapse: अवैध होर्डिंग्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच घाटकोपर दुर्घटनेतील ईगो मीडिया कंपनीचे दादर परिसरात आणखी ८ अनधिकृत होर्डिंग्स असल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

सूरज मसुरकर, मुंबई|ता. १८ मे २०२४

चार दिवसांपूर्वी मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १६ जणांना जीव गमवावा लागला तर जवळपास ८४ जण गंभीर जखमी झालेत. या धक्कादायक प्रकरणानंतर अवैध होर्डिंग्स विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच घाटकोपर दुर्घटनेतील ईगो मीडिया कंपनीचे दादर परिसरात आणखी ८ अनधिकृत होर्डिंग्स असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, घाटकोपर दुर्घटनेत कोसळलेले जाहिरातीचे होर्डिंग्स हे इगो मीडिया कंपनीचे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी इगो मीडिया होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याला अटक करण्यात आली आहे. अशातच याच कंपनीचे आणखी आठ अवैध फलक असल्याचे समोर आले आहे.

इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक पूल परिसरात आठ अनधिकृत फलक आहेत. आठ फलकांपैकी एका फलकाची लांबी ही तब्बल 80 आणि रुंदी 100 फूट आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व फलकांना पालिकेची परवानही नाही याप्रकणी महापालिकेने रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवली असून हे आठही फलक तीन दिवसात काढून टाकावेत अन्यथा पालिका कारवाई करुन त्याचा खर्च रेल्वे कडून वसूल करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने अवैध होर्डिंग्स विरोधात कारवाई सुरू केली आहे. आज यासंबंधी राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाने मोठा निर्णय घेतला असून सर्व जिल्हधिकाऱ्यांना शासकीय जागांवरील अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT