Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्त केली भीती

Hording Accident in bhor pune : पुण्याच्या भोर तालुक्यातही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती
Hording Accident in bhor Saam tv
Published On

पुणे : मुंबईत सोमवारी होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यातही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पुणे सातारा महामार्गावरच्या सेवा रस्त्यालगत सारोळे गवाच्या हद्दीत असलेलं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. होर्डिंग आकारमानाने लहान असल्यानं आणि रस्त्याच्या बाजूला होर्डिंग कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.

पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती
Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार

पुणे-सातारा महामार्गालगत दुरवस्था झालेले छोटे-मोठे अनेक होर्डिंग आहेत. कमकुवत झालेले होर्डिंग वादळ वाऱ्यामुळे कोसळून सर्वसामान्यांचे बळी जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

येत्या चार दिवसांत या भागातील अनधिकृत होर्डिंग कारवाई करणार आहे. असे होर्डिंग नामशेष करण्यात येतील, पुणे प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती
Shirur Loksabha: सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद? निवडणूक अधिकाऱ्यांनी केला खुलासा

पुणे महामहापालिकेकडून ९ होर्डिंग जमीनदोस्त

पुणे महापालिकेने आयुक्तांच्या आदेशानुसार दिवसभरात ९ जाहिरात फलक जमीनदोस्त केले आहेत. कोथरूड- बावधन क्षेत्र, वानवडी क्षेत्र, वारजे- कर्वेनगर क्षेत्र या भागात अनुक्रमे ५,३,१ जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com