Shirur Loksabha: सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील CCTV बंद? निवडणूक अधिकाऱ्यांनी केला खुलासा

Shirur Strong Room CCTV : 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले.
Shirur Strong Room CCTV: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही  बंद
Shirur Loksabha News: Saamtv
Published On

सागर आव्हाड, पुणे, ता. १७ मे २०२४

बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन्स ज्या स्टाँग रुममध्ये ठेवण्यात आले. त्या रुमची सीसीटीव्ही बंद झाल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाने संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता शिरुरमध्येही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकारानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातही सीसीटीव्ही डिस्प्ले बंद झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. 24 तास हे सीसीटीव्ही डिस्प्ले बंद होते. हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सीसीटीव्ही डिस्प्ले सुरू केले. मात्र याबाबत उप जिल्हाधिकारी तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले आहे.

याआधी बारामती तसेच साताऱ्यातही असाच प्रकार समोर आला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही पुन्हा सुरळीतपणे चालू करण्यात आले. याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

Shirur Strong Room CCTV: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही  बंद
Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

दरम्यान, एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम घोटाळ्याबाबत वारंवार आरोप केले जात असतानाच अशा प्रकारे सीसीटिव्ही बंद पडत असल्याने विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shirur Strong Room CCTV: धक्कादायक! सातारा, बारामतीनंतर शिरुरमध्ये ईव्हीएम गोदामातील सीसीटीव्ही  बंद
Pune Breaking News: पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com