Mumbai News: Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai News: यलोगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी दुर्घटना! लोखंडी प्लेट अंगावर पडून २ कामगारांचा मृत्यू

Mumbai Latest News: यलोगेट पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे

सुरज सावंत

Mumbai News: मुंंबईच्या आयडी इंदिरा डॉक्स (Indira Docks) परिसरात यलो गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी प्लेट अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. चंद्रमनी पटेल आणि राहुल पटेल अशी या दोन मृत कामगारांची नावे आहेत. यलोगेट पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

इंदिरा डॉक्स गेट परिसरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. यलो गेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी प्लेट अंगावर पडून दोन कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. चंद्रमनी पटेल, राहुल पटेल अशी या दोन मृत कामगारांची नावे आहेत.

हे दोघेही एम एम इंटरप्रायझेस कंपनीसाठी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी ७ वा दोघेही झोपेत असताना त्यांच्या अंगावर प्लेट पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात नेले आहेत. यलोगेट पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT